सुस्वागतम्

प्रगत जि.प.शाळा या दररोज अपडेट होणाऱ्या सांकेतस्थळावर मी श्री घोरवाडे बी.एस.आपले सु-स्वागत करतो.

ज्ञानसंरचन

ज्ञानसंरचना- एक नैसर्गिक प्रक्रिया
ज्ञानसंरचनावाद (knowledge constructivism) ही कल्पना मागील शतकाच्या सुरुवातीस दोन विचारवंतांनी मांडली. हे दोघेही विचारवंत १८९६ साली जन्मले. पहिला होता फ्रान्स देशातील जिन पियाजे Jean Piaget. त्यांनी ज्ञानसंरचनावादाची संकल्पना जोडली ती मुलांच्या वाढत्या वयाबरोबर वाढणाऱ्या त्यांच्या आकलनशक्तीशी (cognitive development) पियाजेने मुलाच्या जन्मापासून ते पंधरा वर्षांपर्यंत चार गट केले आहेत. या प्रत्येक गटात मुलांच्या विविध आकलनशक्तीचा विकास होत जातो. बालकांच्या वृिद्धगत होणाऱ्या या गुणांचा आपल्या सर्वानाच चांगला अनुभव आहे. जन्मापासून आपल्या देहबोलीतून, कृतीतून, बोलण्यातून प्रत्येक बालक आपल्याला त्याच्या वाढत्या ज्ञानसंरचनेची चुणूक दाखवत असतो. लेव वायगोस्की (Lev Vygotsky) या रशियन तज्ज्ञाला पियाजेच्या मानाने आयुष्य कमी लाभले. वयाच्या अडतिसाव्या वर्षी तो मरण पावला. परंतु त्या अवधीत लोकप्रिय झालेली ज्ञानसंरचनावादाची सामाजिक ज्ञानवृद्धीची आपली वेगळी संकल्पना त्याने मांडली. लेव वायगोस्कीच्या संकल्पनेप्रमाणे बालकांवर त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा, परिवाराचा, परिसराचा आणि त्याचबरोबर संस्कृतीचा, शिक्षकांचा आणि मुख्य म्हणजे त्याच्या मित्रपरिवाराचा फार मोठा प्रभाव पडत असतो. वेळेनुसार या सर्वाना तो स्वत:च्या अनुभवाची जोड देऊन स्वत:ची ज्ञानाची रचना करीत असतो. याचे उत्तम उदाहरण द्यायचे म्हटले तर शहरातील मुले लहान वयातच रिमोट कंट्रोल, मोबाइल आणि आता संगणक आपणहून शिकतात. त्यांना हे कोणी वेगळे शिकवण्याची गरज लागत नाही. त्याच वेळी ग्रामीण भागातला मुलगा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे जंगलाची, शेतीची अथवा वंशपरंपरागत इतर कौशल्याच्या गोष्टी शिकत असतो. या त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत आजूबाजूची नसíगक आणि सामाजिक परिस्थिती, संस्कृती यांचा प्रभाव पडत असतो. मुलांच्या संरचनेत त्यांच्या मित्रपरिवाराचा प्रभाव निश्चितच पडतो. घरापासून ते शाळेपर्यंत जाण्यायेण्याच्या प्रवासात मुले जे ज्ञान शिकतात ते शाळेच्या कुठल्याही अभ्यासक्रमात अथवा पाठय़पुस्तकात नसते. मुलांच्या विश्वात विविध प्रकारच्या ज्ञानाची सतत देवाणघेवाण होत असते आणि मग कधीतरी घरच्यांना किंवा शिक्षकांना हे इतके अचाट आणि अफाट ज्ञान मुलांनी कुठून आणि कसे मिळवले याचे परमआश्चर्य वाटत राहते. हल्लीच्या काळात दूरदर्शन वाहिन्या, नेटसर्फिग, फेसबुकसारख्या मनोरंजक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुले प्रचंड माहिती मिळवत असतात आणि आपापल्या परीने प्रत्येकजण स्वत:ची ज्ञानसंरचना करीत असतो.
जिन पियाजे आणि लेव वायगोस्की यांचे मार्ग वेगळे असले तरी शेवटी एका गोष्टीवर त्यांचे एकमत होते की मुले आपली स्वत:ची ज्ञानसंरचना करतात. या दोघांनंतर या विषया संदर्भात विविध संकल्पना (Theory) अनेकांनी मांडल्या आहेत. ज्ञानसंरचना ही एक नसíगक प्रक्रिया आहे हे प्रत्येकाने मानले आहे.
शैक्षणिक अभ्यास व जीवन कौशल्ये यांची सांगड पाश्चात्त्य अभ्यासकांनी चांगल्या प्रकारे केली आहे. मानसशास्त्रज्ञ होवॉर्ड गार्डनरने विविध मानवी कौशल्यांची सांगड आपल्या मल्टिपल संटिलेसन्स थेअरीमध्ये मांडली आहे. यामध्ये त्याने भाषिक कौशल्य, तर्क आणि गणिती कौशल्य, संगीत, शारीरिक म्हणजे क्रीडा कौशल्य, हस्त कौशल्य, दुसऱ्यांना समजून घेण्याचे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा