सुस्वागतम्

प्रगत जि.प.शाळा या दररोज अपडेट होणाऱ्या सांकेतस्थळावर मी श्री घोरवाडे बी.एस.आपले सु-स्वागत करतो.

सरलबाबतचे दररोजचे updates

*सरल महत्वाचे* :
दिनांक : 11/07/2016
(कृपया सर्व ग्रुप वर share करा)

1)विद्यार्थी ट्रान्सफर request करत असताना जर ज्या विद्यार्थ्याची request करायची होती त्याची request न करता भलत्याच विद्यार्थ्याची request केली गेली असेल तर सदर request जुन्या शाळेला रिजेक्ट करता येत नाही.तसा अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही.तो अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेला आहे.परंतु त्यासाठी अशी चुकीची request आली की अशा शाळेने 7 दिवस  त्या request ला कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही आहे.7 दिवसानंतर अशी request ही मुख्याध्यापकांच्या लॉगिन मधून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला आपोआप ट्रान्सफर केली जाती.गटशिक्षिक्षणाधिकारी सदर request ची शहानिशा करून रिजेक्ट किंवा ट्रान्सफर करू शकतात.परंतु एखाद्या शाळेने जर चुकून अशा चुकीच्या मुलाची आलेल्या request ला कन्फर्म केले असेल तर मात्र सदर विद्यार्थी हा सदर शाळेला ट्रान्सफर होतो.खर तर ही दोन्ही शाळेची चूक आहे.परंतु गडबडीमध्ये असे होऊ शकते.अशा वेळी सदर विद्यार्थ्याची माहिती पुन्हा त्याच्या मूळ शाळेत परत पाठवणे क्रमप्राप्त आहे हे लक्षात घ्यावे.परंतु या स्टेज ला सदर विद्यार्थी त्या शाळेला रिजेक्ट करता येत नाही.यासाठी ज्या शाळेत सदर विद्यार्थी ट्रान्सफर झाला आहे त्या शाळेने तात्पुरत्या स्वरूपात तो विद्यार्थी डमी माहिती भरून update करावा जेणेकरून ऑनलाइन माहिती मध्ये तो विद्यार्थी आता नवीन शाळेचा विद्यार्थी आहे असे दिसून येईल आणि आता मूळ शाळेला पुन्हा ज्या शाळेने सदर विद्यार्थी update केलेला आहे त्या शाळेला नव्यानंए request पाठवा आणि सदर विद्यार्थी नेहमीच्या प्रोसेस ने आपल्या मूळ शाळेत add करून घ्या.अशा वेळी दोन्ही मुख्याध्यापकाने एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे आणि त्यांनी ते वेळेत करावे ही विनंती.अशा केस मध्ये कोणत्याही मुख्याध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे जर विद्यार्थ्यांच्या अपूर्ण आणि चुकीच्या ऑनलाइन माहितीमुळे जर काही समस्याच निर्माण झाली तर दोन्ही मुख्याध्यापाकास जबाबदार धरले जाणार आहे याची नोंद घ्यावी.

यासाठी विद्यार्थी request करताना खालील प्रकारे काळजी घ्यावी
➡विद्यार्थी request करत असताना नवीन शाळेने ट्रान्सफर बटन क्लीक करण्यापूर्वी आपण योग्य विद्यार्थयालाच सलेक्ट केले आहे का ते पहावे.

➡आपणास एखाद्या शाळेची विद्यार्थी ट्रान्सफर request आलेली असेल त्या request ला कन्फर्म करण्यापूर्वी सदर विद्यार्थी आपल्या शाळेतून खरोखर ट्रान्सफर झाला आहे का,ज्या शाळेत ट्रान्सफर झाला आहे त्याच शाळेची request आलेली आहे का ही दाखला मागणी file मध्ये चेक करून मगच सदर विद्यार्थी ट्रान्सफर request कन्फर्म करावी.अन्यथा अशा चुकीच्या request ला काहीच प्रतिसाद देऊ नये.

2) जर आपल्या शाळेत आलेली request मुख्याध्याकाने वेळेत म्हणजेच 7 दिवसात कन्फर्म केली नाही तर ती request कन्फर्म करण्यासाठी beo यांच्या लॉगिन ला जाते.त्यामुळे कामात हलगर्जीपणा अथवा ही बाब वेळेत माहिती न झाल्यामुळे या सर्व request ह्या beo यांच्या लॉगिन ला गेल्या आहेत.अशा request ची संख्या beo यांच्या लॉगिन ला हजारामध्ये आहेत.त्यामुळे मुख्याध्यापकांनी करावयाचे काम हे गटशिक्षणाधिकारी यांनीया करावे लागत आहे.हे करत असताना गटशिक्षणाधिकारी यांना जसे मुख्याध्यापकाला त्या मुलाबद्दल माहिती असते तशी त्या मुलाबद्दल माहिती नसते.म्हणून त्या मुख्याध्यापकाला बोलावूनच सदर काम करावे लागत आहे.म्हणून आता असे होऊ नये म्हणून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला या सर्व request ह्या return करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.अशा हालजारोने आलेल्या request गटशिक्षणाधिकारी यांनी पुन्हा त्या शाळेला कन्फर्म करण्याकरिता परत करावयाच्या आहेत याची नोंद घ्यावी.ज्या शाळेने request पाठवलेली आहे त्या शाळेने ऑन 7 दिवस विद्यार्थी request कन्फर्म होण्यायसाठी वाट पहावी.ज्या request चुकीच्या असल्याने गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला आलेल्या आहेत त्या मात्र शहानिशा करून गटशिक्षणाधिकारी यांनी रिजेक्ट करायच्या आहेतच. गटशिक्षणाधिकारी यांनी request रिटर्न केल्यावर या request कन्फर्म करण्यासाठी जुन्या मुख्याध्यापकाकडे पुन्हा 7 दिवसाचा कालावधी असेल.या 7 दिवसात जर त्या मुख्याध्यापकाने या request कन्फर्म केल्या नाही आणि दुसऱयांदा पुन्हा अशा request गटशिक्षणाधिकारी यांना गेल्या तर मात्र अशा मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे या सूचनेचा गाम्भिर्याने विचार व्हावा ही आपल्या बांधवांना नम्र विनंती..यासनादर्भात अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.

3) काही पालक असे म्हणत असतात की आमच्या मुलाची प्रगती आम्हाला कमी वाटते तेंव्हा आमच्या मुलास या वर्षी नापास करा आणि याच वर्गात बसवा.अशा वेळी हे लक्षात घ्या की rte नुसार आपणास कोणत्याही विद्यार्थ्यास नापास करता येणार नाही.ऑनलाइन सिस्टिम मध्ये देखील तो विद्यार्थी  तुम्हाला मागील वर्गात दाखवता येणार नाही हे लक्षात घ्यावे.अशा वेळी पालकांना समजावे की या वर्षी त्याची आम्ही प्रगती विशेष लक्ष घालून करून घेऊ अशा वेगवेगळ्या पद्धतीने पालकांचे मतपरिवर्तन करावे ही विनंती.

4) मागील वर्षी भरलेल्या विद्यार्थी माहिती मध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दूरस्थ करण्यासाठी आपणास येत्या काही दिवसात सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.तोपर्यंत ट्रान्सफर आणि update चे काम पूर्ण करून घ्यावे ही विनंती.

5)मागील वर्षी माहिती भरलेल्या विध्यार्थी पैकी काही विद्यार्थी मयत झाले असतील अशा मुलांचे नाव सिस्टिम मधून कमी करण्यासाठी लवकरच सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.याची नोंद घ्यावी.

6)इयत्ता 9  च्या पुढील काही मुले शाळा सोडून गेलेली आहेत, काही मुले दाखला घेऊन गेली आहेत तसेच काही मुले परराज्यात शिकण्यासाठी गेलेली आहेत अशा मुलांचे नावे सिस्टिम मधून कशी कमी करावी याबाबत आपणास लवकरच मार्गदर्शन करण्यात येईल.तोपर्यंत आपण घाई न करता  इतर कामे पूर्ण करून घ्यावेत.

7)विद्यार्थी ट्रान्सफर करताना दुसरया माध्यमातून आला असेल तर update करताना माध्यम बदल करता येते याची नोंद घ्यावी.

8)beo यांच्या लॉगिन मध्ये विद्यार्थी ट्रान्सफर करताना ट्रान्सफर झाला आहे या अर्थाची सूचना येते परंतु प्रत्यक्ष विद्यार्थी मात्र ट्रान्सफर होत नाही अशा तक्रारी येत आहे.त्यांनी हे लक्षात घ्यावे की विद्यार्थी ट्रान्सफर केल्यावर सूचना येते त्यानंतर ok बटन क्लीक।करावे आणि  सदर पेज रिफ्रेश करावे त्यानंतर ते नाव आपणास यादी मध्ये दिसणार नाही.

9) ज्या शाळेत नवीन वर्ग अथवा तुकडी निर्माण झालेली आहे अशा शाळांना तो नवीन वर्ग आणि तुकडी add करण्याची सुविधा master या ऑप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.यासंदर्भात अधिक माहिती आमच्या havelieducation.Blogspot.in  ब्लॉग ला भेट द्या.

10)मागील शैक्षणिक वर्षांमध्ये भरलेली 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याची  माहिती सिस्टिम द्वारे ऑटो अपडेट केलेली आहे.म्हणजेच आता मागील वर्षी माहिती भरलेला विद्यार्थी आपणास जर 1 ली ला असेल तर तो आता 2 री ला दिसून येणार आहे.याचाच अर्थ असा की स्टुडंट ट्रान्सफर करताना आतापर्यंत आपण एखाद्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षीच्या वर्गात ट्रान्सफर request करण्यासाठी  शोधत होतो ते आता मागच्या वर्गात न शोधता चालू वर्षीच्या वर्गात शोधावे लागणार आहे याची नोंद घ्यावी.परंतु इयत्ता 9 वीच्या पुढील मुलांचे प्रमोशन हे मॅन्युअली करावे लागणार आहे.अशा शाळेत विद्यार्थी ट्रान्सफर request करताना पुढील शाळेने प्रमोशन केले असेल तर चालू वर्गात त्या विद्यार्थ्याला शोधावे अन्यथा मागेल वर्षीच्या इयत्तेमध्ये त्या मुलाला शोधावे लागेल ही बाब लक्षात ठेवावी.

11)सिस्टिम द्वारे ऑटो अपडेशन करताना फक्त 1 ते 8 वीच्याच मुलांचे पुढील वर्गात अपडेशन होईल,मात्र 9 ते 11 वीच्या मुलांचे updation हे मॅन्युअली करावे लागेल हे सर्व मुख्याध्यापकांनी लक्षात घ्यावे.

12) Duplicate students च्या बाबतीत : विद्यार्थी ट्रान्सफर करण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतल्या डुप्लिकेट म्हणजेच एकाच विद्यार्थ्याची 2 व 2 पेक्षा अधिक वेळा त्या शाळेत नोंद झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या अधिकच्या नोंदी सिस्टिम मधून delete करायचे आहे.आपण जर या डुप्लिकेट नोंदी delete केल्या नाही तर beo आणि Eo लेवल वरून सदर नोंदी delete केल्या जातीलच परंतु आपण या नोंदी delete का केल्या नाही यासाठी आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.कारण या वर्षी होणाऱ्या संच मान्यतेसाठी ही बाब अतिशय महत्वपूर्ण समजली जाणार आहे.तसेच आपल्या शाळेत एखादा विद्यार्थी डुप्लिकेट असेल आणि आपण त्या विद्यार्थ्याच्या अधिक च्या नोंदीला delete केले नसेल तर अशा विद्यार्थ्यास आपणास ट्रान्सफर करता येणार नाही.अशा विद्यार्थ्याची नोंद वरिष्ठ लेवल ला आपोआप सिस्टिम द्वारे कळवली जाईल याची नोंद घ्यावी आणि त्वरित आपल्या शाळेतील डुप्लिकेट स्टूडंट सिस्टिम मधून delete करण्यात यावे.

13) ऑटो प्रमोशन करताना जर एखाद्या शाळेत 1 ते 4 वर्ग असतील अशा शाळेत इयत्ता 4 थी च्या अद्याप इतर शाळेत ट्रान्सफर न झालेले विद्यार्थी सिस्टिम द्वारे त्याच शाळेत निर्माण केलेल्या आभासी 5 वीच्या वर्गात ट्रान्सफर होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ठेवले जाणार आहे.सदर चे विद्यार्थी आपल्या शाळेच्या एकूण पटसंख्येत धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.जेंव्हा या आभासी वर्गातील विद्यार्थ्याची ट्रान्सफर करण्याची request येईल तेंव्हा आपण या विद्यार्थ्यास ट्रान्सफर करू शकाल.अशाच प्रकारे या पद्धतीने पुढील वर्ग नसणाऱ्या शाळांच्या बाबतीत पुढील आभासी  वर्ग सिस्टिम द्वारे  निर्माण करून पुढील इयत्ता नसलेले विद्यार्थी हे अशा वर्गात तात्पुरते ठेवले जाणार आहे.

14) मॅन्युअली प्रमोशन करताना विद्यार्थी अनुत्तीर्ण अथवा absent असूनही जर चुकून पुढील वर्गात प्रमोट झाला तर तर अशा चुकलेल्या प्रमोशन ला आपणास पुन्हा परत (undo) करता येणार येते.

15)तसेच आपल्या शाळेतील 10 वी चे विद्यार्थी 11 वीला न जाता डिप्लोमा अथवा इतर व्यावसाईक शिक्षणास गेले असतील अशा विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदी बाबत देखील काय करायचे हे देखील आपणास लवकरच कळवले जाईल.

16) सरल बाबत अधीक माहिती जाणून घेण्यासाठी व वेळोवेळी अपडेट मिळण्यासाठी राज्यस्तरीय व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामिल व्हा.त्यासाठी havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर जा आणि तेथे राज्यस्तरीय whatsapp समूहात add होण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या गूगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरा.आपणास लवकरच add केले जाईल.

MDM पोर्टल :
(मध्यान्ह भोजन योजना)

17) ज्या शाळांनी  सन 2016-17 मधे वर्ग 5 वा किंवा वर्ग 8 वा सूरू केलेला आहे अशा शाळांची मध्यान्ह भोजन योजनाअंतर्गत  daily attendance ची माहिती भरवायाची असल्याने block mdm login मधे जावून opening balance menu मधे  शाळा माहिती view केल्यानंतर खालच्या बाजूला वर्गाच्या समोर टिक मार्क करावे आणि नविन वर्ग add करुन घ्यावा व माहिती approve करावे . त्यानंतर अशा शाळाना वर्ग 5 किवा वर्ग 8 ची daily attendance माहिती भरण्यासाठी उपलब्ध झालेला दिसेल.

18) MDM मध्ये प्राप्त तांदूळ व धान्यादी माल नोंद करण्याची  सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यासाठी mdm पोर्टल लॉगिन करावे आणि  Stock Inword या tab ला click करावे

➡Date of Recived -- माल प्राप्त झाल्याची तारीख टाकावी.येथे मागील तारीख देखील भरता येते.एक लक्षात घ्यावे की या ठिकाणी शाळा सुरु झाल्यानंतर आलेला माल नोंदवायचा आहे.त्या आधीचा नाही.
➡Stock Provider - येथे धान्य व धण्यादी माल पुरावणार्याचे नाव दिलेल्या लिस्ट मधून सिलेक्ट करावे.यामध्ये FCI,MDM provider,इतर शाळा 1 ते 5  व इतर शाळा 6 ते 8 प्रकार ,आपलीच शाळा 1 ते 5 व आपलीच शाळा 6 ते 8 ,इतर,पब्लिक म्हणजेच लोकसहभाग,ओपन मार्केट असे पर्याय उपलब्ध आहेत. जर शाळेस लोक सहभागातुंन माल प्राप्त झाला असल्यास पब्लिक सलेक्ट करावेत, जर शाळेने शेजारच्या शाळेकडून माल उसनवार घेतला असल्यास other school category नुसार select करावे व खालील रकन्यात त्या शालेचा U-dise Code नमूद करावा, शाळेने खुल्या बाजारातून माल खरीदी केला असेल तर ओपन मार्केट सिलेक्ट करावे आणि खाली दुकानदाराचे नाव भरावे.लोकसहभागातून मिळालेल्या धान्याच्या बाबतीत publc सिलेक्ट करावे आणि खाली ज्यांनी धान्य दिले त्यांचे नाव लिहावे.MDM PROVIDER सिलेक्ट केल्यावर पावतीवरील पुरवठादाराचे नाव टाकावे.अशा प्रकारे माहिती save करावी  यानंतर आपला स्टॉक ऑटोमॅटिक मेन्टेन होईल.

19)सरल संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येईल.तेथे दिलेल्या विविध online google फॉर्म च्या मदतीने आपण आम्हाला आपल्या येणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात सांगू शकाल.तसेच आपण ९४०४६८३२२९ या whatsapp क्रमांकावर देखील message पाठवू शकता (call करू नये ).

20)✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 21) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in  

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*

११ टिप्पण्या:

  1. sir amche prathmik v madhyamik asha 2 shala ahet parntu udise no ha 2016 pryant prathamikchach akach hota tyamule sarv studenchi mahiti prithmik udise var bharali prantu ata madhyamikcha udise midala tar sarve vidhyarthi tyaver transfer kelet tar ata pudhe kay karache update kase karayche plz. help mi sir

    उत्तर द्याहटवा
  2. sir gelya varshi 10 vi laa asanarya student che pramotion karavayache aahe ka

    उत्तर द्याहटवा
  3. sir gelya varshi 10 vi laa asanarya student che pramotion karavayache aahe ka

    उत्तर द्याहटवा
  4. Sant Nadev vidhyalaya Sir gelya varshi 10 vi che student pramotion sati Dakwat nagi amchya yetil 10 student 11 sati pramotion sati dkhat nahi

    उत्तर द्याहटवा